Shripad Chindam | श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका, नगरसेवकपद रद्द
Continues below advertisement
छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. श्रीपाद छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. 2018 साली अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या आधी श्रीपाद छिंदम यानं शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर अहमदनगर महापालिका सभागृहानं छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता. हा ठराव राज्य सरकारकडे विचारार्थ पाठवण्यात आला होता.
Continues below advertisement