CoronaVaccine | मुंबईत केवळ 3 दिवस पुरेल इतकाच साठा, सध्या 1 लाख 85 हजार लस शिल्लक
Continues below advertisement
राज्याकडून वारंवार लसींच्या पुरवठ्याबाबत विनंती करुनही केंद्राकडून लस पुरवठा होत नाही. पुढचा साठा येईपर्यंत मुंबईत केवळ 1 लाख 85 हजार लसीच शिल्लक आहेत. यामध्ये कोविशिल्डचे 1 लाख 76 हजार 540 डोस तर कोवॅक्सिनचे केवळ 8840 डोस शिल्लक आहेत. त्यामुळे कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेणा-यांची अडचण होण्याचीही शक्यता आहे.
प्रत्यक्षात मुंबईची गरज ही 8 ते 10 लाख लशींच्या डोसची आहे. यापैकी 5 ते 6 लाख रिझर्व्हमध्ये साठा हवा जर 5 लाखांपेक्षा कमी स्टॉक झाला तर त्याचा लसीकरण मोहिमेच्या वेगाला फटका बसतो. पुढचा साठा 15 एप्रिलला येणार, तोही अपुराच पडणार आहे.
Continues below advertisement