MPSC Exam Date : MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार, परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही
रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
06 Apr 2021 08:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : गेल्या वर्षभर सुरु असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. गेल्या महिन्यात 21 मार्चला पार पडलेली एमपीएससीची पूर्वपरीक्षा विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच पार पडली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच येत्या रविवारी 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा देखील वेळापत्रकानुसार होणार पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन होऊन परीक्षा पार पाडली जाणार, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.