Shivsena Malvani Jatrotsav : ठाकरेजी, शिवसैनिकांकडे जरा बघा! पालिकेच्या मैदानावर होतायत जत्रोत्सव
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा चक्क शिवसैनिकांनालाच विसर पडलाय...राज्य सरकारच्या निर्बंधांना सत्ताधारी शिवसेनेकडूनच हरताळ फासण्यात आलाय. मुंबईच्या अंधेरीत महापालिकेच्याच मैदानावर शिवसेनेकडून मालवणी जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत डी एन नगर पोलीस स्टेशन समोर असलेल्या मुंबई महापालिकेच्या मैदानावर या मालवणी जत्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.