Shivsena दसरा मेळाव्याला अद्याप परवानगी नाही, शिवसैनिकांनी गाठलं G-North कार्यालय ABP Majha

Continues below advertisement

मुंबई: आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो वा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार असं शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज करुन महिना झाला तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, आता प्रशासनाने ठरवायचं की परवानगी द्यायची किंवा नाही, आमचा निर्णय ठरला आहे, आम्ही दसरा मेळावा घेणारच असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ महापालिकेच्या जी उत्तर कार्यालयामध्ये गेलं होतं. त्या ठिकाणी पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "शिवसेनेने 22  ऑगस्टला दसऱ्या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पहिला अर्ज केला होता. या आधीच्या मेळाव्यासाठी दोन दिवसात परवानगी मिळायची. पण आज आज 20 सप्टेंबर आला तरी त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यासाठी शिवसेनेने महापालिका प्रशासनाला दोन वेळा पत्र लिहिलं तर अधिकाऱ्यांची तीन वेळा प्रत्यक्ष भेट घेतली. त्यावर विधी खात्याचं मत घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधल्याचं या आधी आम्हाला सांगण्यात आलं होतं. विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने त्यांनी आता कोणतंही उत्तर देणार नाही असं सांगितलं."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram