Mumbai BMC Election : मुंबई मनपा निवडणुकीचा धुरळा, शिवसेना - भाजपनं कसली कंबर; मिशन मुंबईला सुरुवात

Continues below advertisement

मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांमुळे या निवडणुकांची चाहूल लागलीय. आगामी पालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगणार असल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांविरोधात भाजप आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज महत्त्वाची बैठक होतेय. निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी फडणवीस यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. पालिकेतील भ्रष्टाचार, घोटाळे आणि भाजपची रणनीती यावर बैठकीत चर्चा होईल. तर तिकडे शिवसेनेनंही पालिका निवडणुकांसाठी कंबर कसलीय. गेल्या निवडणुकीत दोन नंबरवर राहिलेल्या जागांवर शिवसेना लक्ष केंद्रीत करणार आहे. भाजप ज्या ठिकाणी क्रमांक एकवर होता, तिथला अभ्यास शिवसेनेनं सुरु केलाय. गेल्या निवडणुकीत मुंबईतल्या अनेक जागांवर शिवसेना भाजपमध्ये काँटे की टक्कर झाली होती. त्यामुळे या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram