मुंबईच्या शिवडी स्टेशनचं रूप पलटलं, एन.के.सिन्हांच्या मोहिमेला यश, भिंतींवर चित्र, बोधचिन्ह, संदेश!
अस्वच्छतेच्या गर्तेत अडकलेल्या शिवडी स्टेशनने कात टाकलीय. स्टेशनच्या ज्या भिंतींवर पानाच्या पिचकाऱ्या उडायच्या त्याच भिंतींवर सध्या आकर्षक चित्र, बोधचिन्ह , संदेश देणारी माहिती झळकू लागलेली आहे. स्टेशन मास्तर एन के सिंन्हा यांच्या प्रयत्नातून शिवडी स्थानकाचं रुप पालटलंय. 35 अधिकारी-कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत शिवडी स्टेशन दुर्गंधी आणि घाणी पासून मुक्त करण्याची मोहीम राबविण्यात आली.