Shivaji Park वर ठाकरेंच्या मेळाव्याला परवानगी, Shinde Group सुप्रीम कोर्टात जाणार : ABP Majha

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळवण्यासाठीची हायकोर्टातली लढाई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं जिंकली. त्यानंतर शिंदे गटानं आता सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केलीय. शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी प्रतिष्ठेचं शिवाजी पार्क मैदान देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल मंजुरी दिली. त्यामुळं पाच ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार, यावर शिक्कामोर्तब झालं. या निर्णयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता शिंदे गट सुुप्रीम कोर्टात जाणार आहे... काल ठाण्यात शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक पार पडली... या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली....यावरचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola