Shiv Sena Vardhapan Din 2023 : षण्मुखानंद हॉलमध्ये ठाकरे बरसणार, नेस्को सेंटरमध्ये शिंदे गरजणार
तारीख १९ जून १९६६... वय वर्ष ५७... ही गोष्ट आहे एका धगधगत्या पर्वाची... संघर्ष पाचवीलाच पुजलेल्या शिवसेनेची... महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कायम आक्रमक भूमिकांनी रान पेटवणारा पक्ष... कधी सामाजिक असतील, तर कधी वादग्रस्त असतील... किंवा मराठी माणसाचा कैवार घेण्याची भूमिका असो... शिवसेना कायमच चर्चेत राहिली... पण, ५७ वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं... शिवसेनेनं कधी पराभवाचा अंध:कार पाहिला... तर कधी दिग्गज नेत्यांना आणि पक्षांना घामही फोडला... मधल्या काळात बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना कार्यध्यक्ष केलं... त्यानंतर राज ठाकरे, नारायण राणेंसारखे नेते पक्ष सोडून गेले... हा तर झाला इतिहास... मात्र वर्तमानकाळात मात्र शिवसेना कधी पाहिले नव्हते, ते दिवस पाहतीय... एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर तर, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा पूलच बळकावला गेला... आणि त्यानंतर आजचा हा वर्धापनदिन... परंपरेनुसार एक वर्धापन दिन नाही, तर यंदा इतिहासात पहिल्यांदाच... दोन वर्धापन दिन होतायत... एक ठाकरेंचा, आणि दुसरा शिंदेंचा... ठाकरेंचा मेळावा षण्मुखानंद सभागृहामध्ये होतोय. तर शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मेळावा आयोजित केलाय, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार?, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.