Shiv Sena mlas Disqualification : अपात्रता सुनावणी, प्रभूंची उलट तापसणी
Continues below advertisement
आमदार अपात्रता सुनावणीत आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी सुरू आहे. प्रभूंवर २१ जूनच्या व्हीपवरून प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. २१ जूनला संपर्कात नसलेल्या आमदारांना बैठकीचा व्हीप हा व्हॉट्सअॅपद्वारे दिल्याचं सुनील प्रभूंनी म्हटलंय. तर आपल्यासोबत १२ आमदार होते त्यांना थेट व्हीप दिल्याचं प्रभूंनी आपल्या साक्षीत म्हटलंय. सुनील प्रभूंनी १२ आमदारांची नावं या सुनावणीत सांगितली. आमदारांना व्हीप मिळाल्याची पोच घेतली असं आपण म्हणता मात्र त्याचे पुरावे नाहीत असं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी म्हटलंय. मात्र प्रभूंनी पोच घेतली नसल्याचं फेटाळलं.
Continues below advertisement