Shiv Sena MLA Disqualification : जेठमलानींचे प्रश्न, सुनील प्रभूंची उत्तरे; सुनावणीत नेमकं काय झालं?
आमदार अपात्रता सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेतली जातेय. मात्र ज्या गतीने सुनावणी घेतली जातेय. त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केलीय. केवळ १६ दिवस आपल्याकडे आहेत, त्यात सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे असं अध्यक्ष म्हणाले. या गतीने सुनावणी घेतली तर सगळ्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करणं अवघड होईल असं अध्यक्षांनी म्हटलंय.