Anil Parab यांचा Kirit Somaiya यांच्याविरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा, परब म्हणाले...
मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे की, गेले काही महिने माझ्यावर किरिट सोमय्या कुठलेही पुरावे नसताना आरोप करत आहेत. याबद्दल मी 100 कोटींचा दावा दाखल केलाय. यात माफी मागण्याचीही मागणी केलीय. पुरावेही जोडले आहेत. यात मला न्याय मिळेल, असं मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. मी चुकीचे काही केलेले नाही. मी न्यायमुर्तीचे काम हातात घेतलेले नाही. जसं किरिट सोमय्या हातात घेतात.