Shiv Sena vs ED | शिवसेना आक्रमक; ईडी विरोधात रस्त्यावर उतरणार?
: गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच ईडी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. येत्या 5 जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारने शिवसैनिक दाखल होणार आहेत.
येत्या 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर असतील. एकप्रकारचं शक्तीप्रदर्शन शिवसेनेकडून केलं जाणार आहे. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करतंय हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.