Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty ची भूमिका, कुटुंबाची प्रायव्हसी जपली जावी असं शिल्पाचं आवाहन
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडीओ तयार करुन अॅपवर पब्लिश केल्याच्या आरोपामुळे अटक केली आहे. अशातच राज कुंद्राची झळ शिल्पापर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पाही पॉर्नोग्राफिक प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. अशातच शिल्पा शेट्टीनं पहिल्यांदाच या प्रकरणावर उघडपणी आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं म्हटलंय की, ती सध्या या प्रकरणावर काहीही बोलणार नाहीये, कारण हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे.