पूरस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार : मुख्यमंत्री Uddhav Thackeray

मुख्यमंत्री म्हणाले की, आपत्तीची वारंवारता पाहिली तर त्यांचे स्वरूप भीषण होते.  प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचताहेत, निसर्गासमोर हतबलता असते.  पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले.  नदी पात्रातल्या पूर रेषेची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांना काय अर्थ नाही. अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल मग दरडग्रस्त ठिकाणे असतील. बांधकामे देखील नाईलाजाने  दूर करावी लागतील. दोन गोष्टींवर आपल्याला काम करावे लागेल. आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे सुरु झाले आहे, असं ते म्हणाले. सांगली प्रशासनाला नागरिकांनी चांगले सहकार्य केले, या संपूर्ण भागात काही लाख लोकांचे स्थलांतर झाले, जीव वाचले. कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्वाचे आहे, असं ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola