Sheetal Mhatre Vrial Video : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओप्रकरणी SIT ची घोषणा
Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना-शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ प्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी (SIT) गठीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.