Sheetal Mhatre Viral Video : युवा सेनेचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात, आतापर्यंत 5 जणांना अटक
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
13 Mar 2023 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSheetal Mhatre Viral Video: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.