#Lockdown अडचणीत आलेल्या हॉटेल व्यावसायिकांना वीजबिलात सवलत द्या, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : राज्यात कोरोनामुळं लॉकडाऊन करण्यात आला आहे. यात अनेक व्यावसायिकांचं कंबरडं मोडलं आहे. लॉकडाऊनमुळं राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी अशी मागणी करत एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.