Drugs प्रकरणात अभिनेता दलीप ताहील यांच्या मुलाला बेड्या,आणखी सेलिब्रिटींची नावं समोर येण्याची शक्यता
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि नामांकित कलाकार दलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहीलला मुंबई पोलिसांच्या एमसी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. ध्रुवकडून नार्कोटिक्स सेलने 35 ग्राम एमडी (mephedrone) ड्रग्स सुद्धा जप्त केलं आहे.
अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. मुजम्मिल अब्दुल रहमान शेख या ड्रग्ज पेडलरला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून ध्रुव ताहीलचं नाव समोर आलं होतं. 2019 पासून ते मार्च 2021 पर्यंत ध्रुव मुजम्मिल अब्दुल रहमान शेखच्या संपर्कात आला होता. आणि त्याने त्याच्याकडून ड्रग्सची मागणी केली होती. तसेच ड्रग्स विकत घेण्यासाठी ध्रुवने मुजम्मिलला सहा वेळा पैसेही दिले होते.