Sharad Pawar Meets CM Thackeray : शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांनी काल राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली. त्यात शिवसेना आणि काँग्रेसचे मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामं करत नसल्याची तक्रार अनेकांनी केल्याचं कळतंय. याच पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. सोबतच केंद्रीय तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांची चौकशी सुरु आहे. त्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.