Sewri Fort : शिवडी किल्ल्याबाबत 'तो' व्हिडिओ खोटा! ABP माझानं केला Reality Check
मुंबईच्या शिवडी विभागात असलेला प्राचीन शिवडी किल्ला हा नागरिकांसाठी बंद केला असून या वर दर्ग्याचे अतिक्रमण सुरू आहे असा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.मात्र असे खरच काही आहे का? याचा रीयल्टी चेक करण्यासाठी एबीपी माझा ची टीम शिवडी किल्ल्यावर दाखल झाली.मात्र या ठिकाणी कोणीही त्यांना किल्ल्यावर जाण्यास मज्जाव केला नाही.त्याच बरोबर इथे असलेल्या दर्ग्याची आणि अनधिकृत बांधकामाबाबत ही माहिती घेतली असता स्थानिकांनी हे सगळे खोटे असल्याचे सांगितले आहे.इथले स्थानिक दुर्गप्रेमी रुपेश ढेरंगे यांनी या बाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की इथे हा किल्ला साफ सफाई करण्यास काही वेळ बंद करण्यात येतो ,त्याच वेळेस तिथे हे दुर्गप्रेमी आले होते आणि त्या मुळे त्यांना हा गैरसमज झाला आहे.मात्र इथे असे कोणतेही अनधिकृत बांधकामे झालेली नाहीत, इथला दर्गा ही प्राचीन आहे त्याच्या आणि किल्ल्याच्या मध्ये एक संरक्षक भिंत ही आहे.तसेच हा किल्ला सर्वांसाठी खुला देखील आहे.या शिवडीच्या किल्ल्याचा आढावा घेत स्थानिक दुर्गप्रेमी यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी.