Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत काय सांगतो कायदा ? उदय वारूंजीकर यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप होतो आहे की त्यांनी नोकरीतील फायद्यासाठी किंबहुना नोकरीसाठी मुस्लिम धर्मीय असुनही आपलं एससी जातीचं खोटं प्रमाणपत्र दिलं आणि युपीएससीमधे आरक्षण मिळवलं.त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावर त्यांच्या वडलांचं नाव दाऊद वानखेडे आहे आणि धर्म मुस्लिम लिहिला आहे. मात्र एनसीबीच्या वेबसाईटवर त्यांच्या वडलांचं नाव ज्ञानदेव वानखेडे असं आहे. आताही ते म्हणतायत की त्यांचा धर्म हिंदू आहे आणि त्यांनी कधीच धर्म बदलला नाही. या बरोबरच त्यांच्यावर झालेल्या विविध आरोपाबाबत कायदा काय सांगतो? या बाबत जेष्ठ कायदेतज्ज्ञ अडव्होकेट उदय वारूंजीकर यांनी उत्तरे दिली आहेत त्यांच्याशी बातचीत केली आहे ABP माझाचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी..

 

  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola