Mantralaya मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध, धमकी करण्यामागचं कारणही आले समोर
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
30 May 2021 09:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यात पोलिसांनी यश आले आहे. मुंबई येथील मंत्रालयात आज दुपारी बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचा धमकीवजा कॉल करणारा व्यक्तीचे नाव सागर मांढरे आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकडधोकडा या गावाचा तो रहिवासी आहे. धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.