Sanjay Raut Full PC : मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभेच्या निकालावर मोठी 'डील'; राऊतांचा खळबळजनक दावा

Continues below advertisement

मुंबई : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक असे दावे केले आहेत. देशातल्या निवडणूक घोटाळ्यातील हा एक आदर्श घोटाळा आहे. त्यांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतली आहे. ज्या-ज्या ठिकाणी पराभव दिसत होता, त्या त्या ठिकाणी छेडछाड करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रविंद्र वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून गायब करण्यात आला, असा दावा करत त्यांनी वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. 

निवृत्त पीआय सातारकर काय डील करत होते?

वनराई पोलीस ठाण्याचे पीआय राजभर हे अचानक रजेवर का गेले? वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस ठाण्यातून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस (जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते) निवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलीस ठाण्यात चार दिवसांपासून काय डील करत होते? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले आहेत. तसेच वनराई पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी करावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram