Sanjay Kadam IT Raid : अनिल परबांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाचे छापे ABP Majha

Sanjay Kadam IT Raid : परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभाग धडकलं आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. त्यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरीही आयकर विभागाची धाड पडली. एकाच दिवसात शिवसेनेशी संबंधित दोघांच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

आयकर विभागानं शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागानं छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परबांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या संजय कदम यांच्या घरी देखील आयकर विभागानं धाड टाकली आहे. संजय मानजी कदम हे शिवसेनेच्या अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे संघटक आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola