Kranti Redkar UNCUT : संरक्षण मिळाल्यानंतरही कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येतात -Kranti Redkar

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांमुळे चर्चेत आणि वादात आलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी आज पत्रकार पत्रकार परिषद घेतली. संरक्षण मिळाल्यानंतरही मला, मुलांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करणाऱ्या मलिकांनाही प्रत्युत्तर दिलं असून पुरावे असतील तर कोर्टात जा, ट्विटरवर बेछूट आरोप करुन एखाद्या शासकीय पदावरील व्यक्तीची बदनामी का करता, असा सवालही क्रांतीनं उपस्थित केला. यावेळी मंत्री म्हणून सोशल मीडियाचा योग्यरित्या वापर करण्याचा सल्लाही मलिकांना दिला. तर, वानखेडेंची खूर्ची जाण्यानं कुणाचा फायदा होईल, असं म्हणत नाव न घेता मलिकांवरही निशाणा साधला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola