Sameer Wankhede:पहिल्या लग्नावेळी समीर वानखेडे मुस्लिम, वानखेडेंचं पहिलं लग्न लावणाऱ्या काझींचा दावा

Continues below advertisement

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्याचं पाहायला मिळत आहे.  अशात आता समीर वानखेडे यांचं पहिलं लग्न (निकाह) लावणाऱ्या काझींनी नवा दावा केला आहे. पहिल्या पत्नीशी निकाह करताना समीर वानखेडे मुस्लिम होते, असा दावा समीर वानखेडे यांचा निकाह लावणाऱ्या काझींनी केला आहे.  निकाह लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांनी एबीपी माझाशी बोलताना हा दावा केला आहे. समीर वानखेडे यांचे  वडीलही मुस्लिम असल्याचा दावा काझी अहमद यांनी केला आहे. समीर वानखेडे खोटं बोलत असल्याचा आरोप देखील काझी यांनी केला आहे. मौलाना मुजम्मिल अहमद यांनी म्हटलं आहे की, जर त्यांनी हिंदू सांगितलं असतं तर निकाहच झाला नसता. सर्व मुसलमान होते. जर मुसलमान नसते तर शानदार निकाह झाला नसता. मुसलमान नसते तर हे नातंच बनलं नसतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram