Cricket : Quinton de Kockचा Black Lives Matter ला विरोध ? विंडीजविरुद्धच्या सामन्यातून घेतली माघार
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकनं विंडीजविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली. आयसीसीच्या निर्देशानुसार विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक सामन्याआधी दोन्ही संघांकडून ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर या चळवळीला समर्थन दिलं जातं. पण डी कॉकनं असं न करता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातच विरोध दर्शवला होता आणि याच कारणामुळे त्यानं दुसऱ्या सामन्यात खेळायचं टाळलं आहे. दरम्यान नाणेफेकीवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बवुमानं व्यक्तिगत कारणामुळे डी कॉक खेळत नसल्याचं म्हटलं होतं. पण क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं याबाबत सविस्तर पत्रक जाहीर केलं आहे. या पत्रकात आयसीसीच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक खेळाडूनं वर्णभेदाविरुद्ध आपला पाठिंबा दर्शवणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. डी कॉकच्या आजच्या कृतीची दखल घेतली जाईल असही या पत्रकात नमूद करण्यात आलंय.
Tags :
Cricket Quinton De Kock Black Lives Matter South Africa Vs West Indies South Africa Cricket West Indies Cricket Quinton De Kock Black Lives Matter