Cruise Drugs Case : समीर वानखेडेंची सत्र न्यायालयात धाव, संभाव्य कारवाई टाळण्यासाठी खटाटोप सुरु
क्रूझ पार्टी प्रकरणी गौप्यस्फोट करुन खळबळ उडवून देणारे पंच प्रभाकर साईल हे मुंबई पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. काल केलेल्या गौप्यस्फोटामुळं माझ्या जीवाला धोका आहे, त्यामुळं संरक्षण मिळावं अशी मागणी प्रभाकर साईलकडून करण्यात येते आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी सॅम नावाच्या मध्यस्थार्फत किरण गोसावीनं शाहरुखकडे 25 कोटी मागितले ज्यातले 8 कोटी समीर वानखडेंना देण्यात येणार होते असा गौप्यस्फोट काल प्रभाकर साईल यांनी केला होता. तर प्रभाकर यांच्या दाव्यामुळं अडचणीत सापडलेल्या समीर वानखेडेंकडून संभाव्य कारवाई टाळण्यासाठी खटाटोप सुरु असून काल पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना पत्र लिहिल्यानंतर समीर वानखेडेंनी आज सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. क्रूझ पार्टी प्रकरणी सुरु असलेला तपास प्रभावीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच मला धमकावण्यात येतंय अशा स्वरुपाचं प्रतिज्ञापत्र समीर वानखेडेंनी न्यायालयात सादर केलं आहे.