Sameer Wankhede : NCB ने समीर वानखेडे यांचे पंख छाटले? सहा मोठी प्रकरणंही हातून काढली
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे, आणि मंत्री नवाब मलिकांच्या आरोपांमुळं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले समीर वानखेडे यांचे पंख छाटल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण आर्यन खानसह सहा हायप्रोफाईल प्रकरणांचा तपासाची धुरा वानखेडेंच्या हातून काढून, दिल्लीच्या एसआयटीच्या हाती देण्यात आली आहे. ज्यात नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे एनसीबीच्या दिल्ली विभागाचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली ही एसआयटी तपास करणार असून, हे पथक मुंबईत दाखल झालंय. दरम्यान समीर वानखेडे देखील संजय सिंग यांच्या पथकाला सहकार्य करणार असल्याचं एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आलंय..
Tags :
Ncp Nawab Malik SHAH RUKH KHAN NCB Sameer Wankhede Aryan Khan NCB Sameer Wankhede SIT Sameer Wankhede