Sameer Wankhede : Aryan Khan, 25 कोटी, 50 लाख ते परदेशी वाऱ्या; समीर वानखेडेंची CBI चाैकशी
Continues below advertisement
IRS अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयने पुन्हा चौकशी सुरू केलीय. वानखेडेंची सकाळी 3 तास चौकशी झाली. वानखेडेंच्या चौकशीसाठी दिल्लीतूनही सीबीआयची टीम आलीय. वानखेडेंची मालमत्ता, त्यांच्या महागड्या गाड्या आणि त्यांचा परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात येतायत, तसंच, आर्यन खान प्रकरणातील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द NCBच्या SITनं सादर केलेला अहवाल, या सगळ्यावरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येतेय. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागितल्याचा समीर वानखेडेंवर आरोप आहे.
Continues below advertisement