Sameer Wankhede : एसीबी ऑफिसच्या CCTV सोबत छेडछाड? वायर उंदराने कुरतडली, NCB चा दावा
Continues below advertisement
समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय आता आर्यन खानची चौकशी आणि अटकेदरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, हेही तपासणार आहे. कारण २ ऑक्टोबरल २०२१ रोजी जेव्हा आर्यन खानला अटक झाली, त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेजच उपलब्ध नाहीये... २५ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीचं एसआयटी पथक मुंबई एनसीबी कार्यालयात पोहोचलं होतं.. आर्यन खान प्रकरणाचा तपास कसा करण्यात आला, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवलं. मात्र सीसीटीव्ही आणि त्याचा डीव्हीआर करप्ट झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. सीसीटीव्हीची वायर उंदरानं कुरतडली, असं कारण एनसीबी कार्याकडून देण्यात आलं. मात्र या कारणावर सीबीआयचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज गहाळ कसं झालं, याचाही तपास सीबीआय करणार आहे.
Continues below advertisement