Sameer Wankhede : क्रूझ ड्रग्ज कारवाईप्रकरणी समीर वानखेडेंवर कुठलीही कारवाई होणार नाही
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात खंडणीचे आरोप झालेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आता मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय... तूर्तास कोणतीही कठोर कारवाई राज्य सरकारला आता करता येणार नाही... कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे आणि याच प्रकरणातील पंच किरण गोसावी यांनी आर्यन खानला सोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता... आणि याच प्रकरणी राज्य सरकारनं चौकशी सुरु केली होत्या त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई होण्याची समीर वानखेडे यांना भिती होती... अशी कोणतीही कारवाई होऊ नये म्हणून समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची समीर वानखेडे यांनी मागणी केली होती.... आणि याच प्रकरणात आता समीर वानखेडे यांनी दिलासा मिळालाय...