Saamana Editorial | कोरोनामधून सुटका कशी होईल ते सांगा, आता प्रवचने नकोत; सामनातून फडणवीसांवर टीका
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वारंवार ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून टीकास्त्र डागण्यात आलं आहे. 'महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे.', असा सल्ला फडणवीसांना अग्रलेखातून देण्यात आला आहे.