Aryan Khan Released : शाहरुखचे अनोखे फॅन्स, आर्यनच्या सुटकेनंतर मन्नतबाहेर हनुमान चालीसाचं पठण

आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मन्नत बंगल्याबाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती. या गर्दीत एका बाबानं हनुमान चालीसाचं पठण सुरु केलं.  शाहरुखचा फॅन असलेला नंदीबैल वाल्यानं शाहरुखच्या गाण्याची धुन वाजवली. आता एवढी गर्दी पाहिल्यानंतर चोरट्यांचा सुळसुळाट तर साहजिकच आहे.... मन्नत परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने चोरांनीदेखील हातसाफई केल्याचे पाहायला मिळत आहे. मन्नत परिसरातून गर्दीच्या वेळी मोबाईल चोरीच्या घटना वारंवार समोर येत होत्या. त्यानंतर आर्यन खानच्या सुटकेनंतर शाहरूख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी चोरांची टोळी अनेकांचे मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत या टोळीला ताब्यात घेतले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola