Sachin Waze : 'कथित मैत्रिणीला बिझनेस वुमन बनवायचं होतं!', खास मैत्रिणीसाठी दोन कंपन्यांचा घाट
Continues below advertisement
मुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने कोर्टात सुमारे 10,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात एनआयएने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुमारे 158 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्या साक्षीदारांच्या निवेदनात अशी काही विधाने आहेत, ज्यात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या खुलाशांमुळे सचिन वाझे याच्या जीवनातील दडलेले पैलू जगासमोर आले आहेत. सचिन वाझेच्या गुप्त आणि कथित मैत्रिणीचेही यामध्ये एक महत्त्वाचे विधान आहे, जी कधीकाळी व्यवसायाने एस्कॉर्ट सेवेशी संबंधित होती.
Continues below advertisement