Sachin Vaze : सचिन वाझेंसाठी अनिल देशमुख नव्हे परमबीर सिंह हेच नंबर 1; पोलिसांकडे 12 साक्षीदारांचा जबाब
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे वसुली करताना नंबर वन असा उल्लेख कुणासाठी करत होते? अनिल देशमुख की परमबीर सिंह? वाझे यांच्यासाठी परमबीर सिंह हेच नंबर वन होते, असा जबाब 12 साक्षीदारांंनी कॅमेऱ्यासमोर दिलाय. परमबीर सिंह यांच्यावर झालेल्या वसुलीच्या आरोपांची चौकशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ईडीला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यासाठी नंबर वन होते असं सांगितलं होतं. पण वाझेंसाठी अनिल देशमुख नव्हे, तर तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच नंबर वन होते असं 12 साक्षीदारांनी गुन्हे शाखेला दिलेल्या जबाबात म्हटलंय. गोरेगावमधील व्यावसायिक विमल अग्रवाल यांनी वाझे आणि परमबीर सिंह यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. या दोघांसह अन्य लोकांनी त्यांच्याकडून बार आणि रेस्टॉरंटवर छापा न टाकण्यासाठी 9 लाख रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी परमबीर सिंह यांना बोलावण्यात आलं होतं. पण ते हजर झाले नाहीत.