ED Inquiry : खडसेंच्या अडचणीत वाढ, मुंबई सत्र न्यायालयानं मंदाकिनी खडसे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
माझ्या मागे ईडी लावाल तर मी सीडी लावेन असं वक्तव्य केलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसमोरच्या अडचणी वाढल्यात. कारण न्यायालयानं खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा जामीन अर्ज फेटाळून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलंय. त्यामुळे ईडी आता कुठल्याही क्षणी मंदाकिनी खडसेंना अटक करण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण 2016 सालचं प्रकरण आहे, त्यावेळी एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या अटकेत आहेत.