Sachin Ahir on MVA Sabha : मविआच्या सभेसाठी जाणीवपूर्वक लहान मैदान दिलं, सचिन अहिरांचा आरोप

Continues below advertisement

Sachin Ahir on MVA Sabha : मविआच्या सभेसाठी जाणीवपूर्वक लहान मैदान दिलं, सचिन अहिरांचा आरोप

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महाविकास आघाडीने आज मुंबईत धडक मारलीय. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर थोड्याच वेळात महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा होतेय... या सभेची प्रचंड उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिलीय... याआधी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या दोन जोरदार सभा झाल्यात... आणि आता मुंबईतून महाविकास आघाडीचे नेते सरकारवर तुटून पडणारेत. या सभेच्या निमित्ताने राजधानी मुंबईत महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहे... काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी दोन नेते या सभेत भाषण करणार असून, विरोधी पक्षनेते अजित पवारही वज्रमूठ सभेत भाषण करणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram