Saamana on Pawar Meet:'डिजिटल युगात गुप्त राहील असं काहीच नाही'; पवारांच्या भेटीवर सामनातून हल्लाबोल

Continues below advertisement

Saamana on Pawar Meet:'डिजिटल युगात गुप्त राहील असं काहीच नाही'; पवारांच्या भेटीवर सामनातून हल्लाबोल राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही. चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला. त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीर्याने घेतला पाहिजे. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे. त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळय़ातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. दोन पवारांची 'गंमतभेट' व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे 'गंमत जंमत' नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram