Andheri East Bypolls : Rutuja Latke यांची उमेदवारी धोक्यात? मनपा राजीनामा स्वीकारणार?

Continues below advertisement

Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीतील (Andheri East Bypoll 2022) शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी सध्या सुरू असलेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आता, निवडणूक लढणार तर मशाल या निवडणूक चिन्हावरच लढणार असून माझ्यावर कोणताही दबाव नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ऋतुजा लटके यांनी एबीपी माझाशी (ABP Majha) बोलताना सांगितलं की, "माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटलेले नाही. अंधेरीतील पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढणार" तसेच, "आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच आहे. माझे पती रमेश लटके (Ramesh Latke) यांचीही निष्ठा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेबांसोबत होती. आता मी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. राजीनाम्यासंदर्भात पुन्हा एकदा विनंती करणार आहे की, मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा.", असंही त्या म्हणाल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram