Special Report On Samruddhi Highway | 'समृद्धी' महामार्गावरील 120 किमी वेगमर्यादा अपघातांना आमंत्रण?

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन चालविण्याची मुभा आहे. हा वेग नेहमीच अपघातांना आमंत्रण देणारा अन जीव घेणारा ठरतो. अशावेळी समृद्धी महामार्गावर 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन चालविण्याची मुभा दिली जाणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा विचार करता, हा वेग नक्कीच प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची निर्मिती झाली तेंव्हा सुरुवातीला 80 किमी प्रति तास वेगाची मुभा होती. कालांतराने त्यात बदल करण्यात आला. सध्या 100 किमी प्रति तास इतक्याच वेगाने वाहन चालवणं बंधनकारक करण्यात आलं. वाहनं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित झाली म्हणून प्रति तास 20 कीमी अशी वाढ करण्यात आली. परंतु अपघाताचे सत्र अद्यापही कायम आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा याच मार्गावर अपघाती निधन झालं. तेंव्हा त्यांचं वाहन सुद्धा 100 किमी प्रति तास वेगापेक्षा अधिक वेगानं धावत होतं. त्यामुळं या मार्गावर होणाऱ्या अपघातानंतरच्या निष्कर्षात वेग मर्यादा हेच कारण बहुतांश वेळी समोर आलेलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola