MCA Times Cricket Shield च्या अंतिम सामन्यात Route Mobile Communications ची Nirlon वर मात

निखिल नाईकची नाबाद 144 धावांच्या खेळीला असिफ शेख आणि निशाद प्रभाकरच्या प्रभावी माऱ्याची लाभलेली साथ रुट मोबाईलच्या यशात निर्णायक ठरली. रुट मोबाईलनं निरलॉन स्पोर्टस क्लबचा पराभव करून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टाईम्स ढाल ब गटाचं विजेतेपद पटकावलं. बीकेसीतल्या एमसीएच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात रुट मोबाईलनं पहिल्या डावात 310 धावांची मजल मारली होती. त्यात निखिल नाईकनं 124 चेंडूत नाबाद 144 धावांची खेळी उभारली. केली. आदित्य श्रीवास्तवनं 55 धावांची खेळी केली. त्यानंतर आसिफ शेखनं पाच आणि निशाद प्रभाकरनं तीन विकेट्स काढून निरलॉनला संघाला 297 धावात रोखलं. रुट मोबाईलला पहिल्या डावात मिळालेली तेरा धावांची हीच आघाडी फायनलमध्ये निर्णायक ठरली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola