Robber arrested with pistol | 'मातोश्री'बाहेर दरोडेखोराला पिस्तुलासह अटक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेरून एका दरोडेखरोला अटक करण्यात आली आहे. इर्शाद खान असं या दरोडेखोराचं नाव आहे. मातोश्रीच्या शंभर मीटर परिसरातून आरोपी इर्शाद खानला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपीकडून एक पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. आरोपी याठिकाणी काय करत होता, याची पोलीस कसून तपासणी करत आहेत.