रिक्षा हस्तांतराच्या नियमांचं पालन आवश्यक, सगळ्यांसाठी नियम सारखे : Nawab Malik

Continues below advertisement

मुंबई : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांची नोंद ठेवणं गरजेचं असल्याचं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच यासोबतच रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणावर चाप लावणं गरजेचं असल्याचंही मुख्यमंत्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे मुद्दे वेळोवेळी उपस्थित केले होते. तसेच हेच मुद्दे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही पटलेत, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल गृहविभागाशी महत्त्वाची चर्चा केली. या बैठकीत त्यांनी परप्रांतिय आणि रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाविषयी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram