Refinery साठी विदर्भ आणि कोकणात रस्सीखेच, पेट्रोलियम मंत्र्याचा बासरु सोलगावला हिरवा कंदील
रिफायनरी प्रकल्पासाठी कोकण आणि विदर्भात रस्सीखेच सुरु झालीय. स्थानिकांच्या विरोधामुळे रखडलेल्या राजापुरातील रिफायनरीला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी हिरवा कंदील दाखवल्याचं कळतंय. तर रिफायनरी तीन तुकड्यांत विभागून त्याचा एक भाग विदर्भाला मिळावा म्हणून विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलनं प्रयत्न सुरु केलेत.