Maharashtra Rain Update | मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला हवामान विभागाकडून रेड अलर्ट
अभिषेक मुठाळ
Updated at:
09 Jun 2021 05:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पुढील दोन ते तीन तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यात विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, परभणीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे.