ABP News

Governor Shaktikanta Das | ऑगस्ट महिन्यापर्यंत कर्जदारांना दिलासा : RBI गव्हर्नर शक्तिकांत दास

Continues below advertisement
मुंबई : देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्जदारांना हा दिलासा देण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये  40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे. दरम्यान 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आज त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी यावेळी सांगितलं की. रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट 4.4 टक्क्यांवरुन 4 टक्क्यांवर आणला आहे. या कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram