Raza Academy on Mosque Loudspeaker : मशिदीवरील भोंगे खाली उतरवणार नाही : रझा अकादमी ABP Majha
मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला असला तरी त्याला रझा अकादमी या संघटनेनं विरोध दर्शवलाय. मशिदीवरील भोंगे खाली उतरवणार नाही, अशी भूमिका रझा अकादमीनं घेतलीय. प्रत्येक मशिद भोंग्यांसाठी परवानगी घेणार असल्याचं रझा अकादमीकडून स्पष्ट करण्यात आलंय. भोंग्यांबाबत मनसे राजकारण करतंय असा आरोप रजा अकादमी अध्यक्ष सईद नुरी यांनी केलाय.