Rashmi Shukla Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन्ही FIR हायकोर्टाकडून रद्द, एक पुण्यात, तर दुसरा मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवला होता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. मविआ सरकार सत्तेवर असताना हे दोन FIR नोंदवण्यात आले होते